वॉशिंग्टन : जगभरातील इंटरनेट ठप्प झाल्यानंतर एकच गदारोळ पाहायला मिळाला. यानंतर काही वेळातच सोशल मीडियावर Internet Down आणि Internet Outage असे हॅशटॅगही ट्रेंड झाले. या इंटरनेटच्या तांत्रिक दोषामुळे Amazon, Reddit आणि Twitch सह अनेक मोठमोठ्या कंपन्यांच्या वेबसाईट्सलाही फटका बसला. इतकंच नाही तर ब्रिटची सरकारी वेबसाईटसह फायनान्शियल टाईम्स, द गार्डियन आणि न्यूयॉर्क टाईम्सची वेबसाईट देखील बंद पडली होती.
जगभरात या काळात अनेक वेबसाईट्स ठप्प झाल्या होत्या. यात Stackoverflow, रेडिट, ट्विट्च, गिटहब, कोरा, अमेझॉन वेब सर्विस, शोपिफाई, ट्विटर, अमेझॉन, Vimeo, गुगल, Spotify, गुगल ड्राईव्ह, मेगा, एअरटेल, पेपाल, युट्यूब, स्पीडटेस्ट, फ्रीफायर, इंस्टाग्राम, वोडाफोन, गुगल मीट, जिओ, गुगल मॅप्स, एक्सायटेल, बीएसएनएल, व्हॉट्सअॅप, लाईन, Hulu, जीमेल, नेटफ्लिक्स, अॅक्ट, आयडिया, स्टीम, इत्यादींचा समावेश होता.
दुपारी साडेतीन ते साडेचार या दरम्यान हा इंटरनेट बिघाड झाल्याचं पाहायला मिळालं. इंटरनेट ठप्प होण्यामागे क्लाउड कंप्युटिंग प्रोव्हायडर कंपनी फास्टली जबाबदार असल्याचं उघड झालंय. कंपनीने देखील याबाबत कबुली दिलीय. फास्टलीने म्हटलं आहे, आमच्या ग्लोबल कंटेंट डिलिव्हरी नेटवर्कमध्ये (सीडीएन) एक अपडेशन करत असताना काही तांत्रिक बिघाड झाला होता. जवळपास एक तास इंटरनेट सेवा ठप्प होती. त्यानंतर जगभरातील वेबसाईट्स पुन्हा सुरुळीत होऊ शकल्या.
Fastly ने म्हटलं, आम्हाला एका सर्विस कॉन्फिगरेशनची माहिती मिळाली आहे. त्यामुळेच जागतिक पातळीवर आमच्या पीओपीमध्ये (पॉइंट्स ऑफ प्रीजेंस) अडथळे आले होते. पीओपी माहिती जागतिक पातळीवर वितरित सर्व्हर्सला पाठवायला परवानगी देतो. हे सर्व्हर शेवटच्या वापरकर्त्यांपासून जवळ असतं. आता जागतिक नेटवर्क पुन्हा सुरळीत झालं आहे.
सीडीएन प्रॉक्सी सर्व्हरच्या रूपात काम करते. तुम्ही जेव्हा एखादी वेबसाईट उघडता तेव्हा वेबसाईटवरील माहिती तुम्हाला पाहण्यासाठी ही माहिती एका सीडीएन सर्व्हरवर साठवली जाते. जेणेकरुन वापरकर्त्यांना प्रत्येकवेळी वेब पेज लोड करताना मुख्य सर्व्हरवर जावे लागू नये.