#InternationalYogaDay: पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून ‘योग’ दिनाला प्रोत्साहन

नवी दिल्ली – येत्या 21 जून रोजी होणाऱ्या ‘आंतरराष्ट्रीय योगदिनाचे’ औचित्य साधून भारतासह इतर देशांमध्ये देखील ‘योग’ अभ्यासाची जनजागृती करण्यात येत आहे. आणि याला हजारो नागरिकांनी मोठ्या संख्येने प्रतिसाद दिल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आता, आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील ‘योग’ ज्ञानशैलीचे महत्व वाढल्याचे चित्र दिसून येत आहे.

यामध्ये ऑस्ट्रेलिया, संयुक्त अरब अमिराती, अबू-धाबी, फ्रान्स यांसारखे देश सहभागी झाले आहे. त्यामुळे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ‘योग’ ज्ञानशैलीचे आयोजन करून, योग दिनाला प्रोत्साहन देण्याचे आवाहन जागतिक स्तरावरील देशांना केले आहे. यासंदर्भातील ट्विट देखील पंतप्रधान मोदींनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केले आहे.

दरम्यान, येत्या 21 जून रोजी भारतासह इतर देशांमध्ये सुध्या 5 वा ‘आंतरराष्ट्रीय योगदिन’ साजरा करण्यात येणार आहे.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.