कोल्हापूर – जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय योग दिन प्रचंड उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हा प्रशासना सोबत शिक्षणाधिकारी माध्यमिक आणि प्राथमिक, जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या सहयोगाने कोल्हापूरच्या सेंट झेवियर्स हायस्कूल मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्यासह विविध विभागातील अधिकारी यावेळी उपस्थित होते. तसेच सेंट जेवियर स्कूल मधील पाचशेहून अधिक विद्यार्थी या आंतरराष्ट्रीय योग दिन आत सहभागी झाले होते. सकाळी साडेसहा वाजल्यापासून सेंट झेवियर स्कूलच्या मैदानावर ती विविध प्रकारची योगासन करण्यात आली.