पारनेरच्या न्यू आर्टस्‌ महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

पारनेर -पारनेर येथील न्यू आर्टस्‌ महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेना यांच्या संयुक्त विदयमाने पाचवा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. या योग दिनानिमित्त महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रंगनाथ आहेर यांनी योगाचे महत्व मानवी आरोग्यासाठी उपयोगी कसे आहे, हे सांगितले.

निरोगी शरीरासाठी व्यायाम हा महत्वाचा असतो. मानवी शरीराची कार्यक्षमता वाढविण्यासाठी आणि आपला आत्मविश्वास दृढ करण्यासाठी आरोग्य हे महत्वाचे असते. खऱ्या अर्थाने योगामुळे शरीराच्या व्याधी कमी होतात. मिहाविद्यालयातील स्वयंसेकाबरोबर शिक्षकांबरोबर योगाची प्रात्यक्षिकांमध्ये सहभाग घेतला. योग दिनानिमित्त महाविद्यालयातील ज्येष्ठ प्रा. डी. एस. दळवी व प्राध्यापक संजय गायकवाड यांनी संयसेवकांकडून योगाची प्रात्यक्षिके करून घेतली.

या योग प्रात्यक्षिकात उपप्राचार्य डॉ. दिलीप ठुबे, डॉ. तुकाराम थोपटे, लेफ्टनंट भरत डगळे, राष्ट्रीय सेवा कार्यक्रम अधिकारी प्रा. संजय आहेर, डॉ. दीपक सोनटक्के, डॉ. हरेष शेळके, न्यू इंग्लिश स्कूलचे एन सी सी प्रमुख प्रा. संतोष पारधी, गिरीष साळवे, स्वाती वालझाडे, हृषी औटी तसेच महाविद्यालयातील 277 स्वयंसेवक तसेच प्राध्यापक सहभागी झाले.

याबद्दल संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार झावरे पाटील, उपाध्यक्ष रामचंद्र दरे, सचिव जी. डी. खानदेशे, सहसचिव ऍड. विश्वासराव आठरे, खजिनदार डॉ. विवेक भापकर, राहुल झावरे यांनी अभिनंदन केले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here