नवी दिल्ली : भारतासह संपूर्ण जगात आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्यात येतो. योग फॉर वेलनेस’ ही या वर्षीची थीम आहे. शारीरिक आणि मानसिक कल्याणासाठी योग अभ्यास करण्यावर या थीमचा भर आहे. याच पार्श्वभूमीवर लडाखमध्ये ITBPच्या जवानांनी योगासन करून हा दिवस साजरा केला.
#WATCH | ITBP (Indo-Tibetan Border Police) personnel perform Yoga at an altitude of 18,000 ft in Ladakh, on #InternationalDayOfYoga pic.twitter.com/nszW0LpdyY
— ANI (@ANI) June 21, 2021
लडाखमध्ये ITBPच्या दरवर्षीप्रमाणे या वर्षीही योगदिन साजरा केला.या जवानांनी तब्बल १८ हजार फूट उंचीवर योगा केला. जागतिक योग दिनाचे औचित्य साधून राज्यातील 2 हजार 700 पेक्षा अधिक ठिकाणी हा कार्यक्रम साजरा होत असतो. मात्र, यंदा करोनाचे संकट असल्याने कोणताही सार्वजनिक कार्यक्रम होणार नसल्याचे सांगण्यात येत आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर उत्तम आरोग्यासाठी योगसाधनेचे महत्व लोकांना पटवून दिले जाणार आहे. 21 जून हा वर्षातील सर्वात मोठा दिवस असतो. योगामुळे माणसाला दीर्घायुष्य मिळण्यास मदत होते.