जागतिक व्याघ्रदिनानिमित्त जगभरामधून शुभेच्छा !

जगभरामध्ये वाघांच्या प्रजाती लोप पावत चालल्या आहेत. बुद्धिवान,शक्तिशाली व चपळ असणाऱ्या या प्राण्याच्या मानवाने केलेल्या अनियंत्रित शिकारीमुळे जगभरात गेल्या काही दशकांमध्ये वाघांची संख्या झपाट्याने घटत आहे. २९ जुलै २०१० रोजी रशियातील सेंट पिटर्सबर्ग येथे झालेल्या व्याघ्र परिषदेमध्ये २९ जुलै हा दिवस जागतिक व्याघ्र दिवस म्हणून साजरा करण्याचे निश्चित करण्यात आले.
जागतिक व्याघ्र दिनानिमित्त जगभरामधून आज शुभेच्छा देण्यात येत आहेत. युनाइटेड नेशन्स तर्फे करण्यात आलेल्या ट्विट मध्ये चायनीज गायक वांग जिंगकाई याने वाघांच्या संरक्षणासाठी गायलेल्या गाण्याची लिंक शेअर केली आहे.

राज्याचे वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी देखील जागतिक व्याघ्र दिनाच्या ट्विटर द्वारे शुभेच्छा दिल्या आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

https://twitter.com/SMungantiwar/status/1023471483622973441

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)