आंतरराष्ट्रीय तायक्‍वांदो स्पर्धेत पुण्याच्या खेळाडूंचे चमकदार यश

पुणे – पुण्याच्या खेळाडूंनी 3 सुवर्ण, 9 रौप्य आणि 12 ब्रॉंझपदक पटकाविली आणि दक्षिण कोरियामधील ग्वांजू येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय तायक्‍वांदो स्पर्धेत कौतुकास्पद कामगिरी केली.

अदितेज कुरुमद्दाली, केतकी गोडसे, माधुरी गायकवाड या पुण्याच्या खेळाडूंनी सुवर्णपदकाची कमाई केली. या स्पर्धेत पुण्याचे 75 खेळाडू सहभागी झाले होते. पुमसे प्रकारात अवनी पाटणकर, वेदिका पुजारी, श्रीराम कटके, कुणाल खेंगरे, तौहीद सय्यद, प्रेम शिंदे, संजीव रवीक्रिष्णा, जेकॉब इजू, ऐश्‍वर्या रौटेला यांनी रजतपदकाची कमाई केली.

आदी फैजपुरकर, सम्यक लाहौटी, आदर्श जगताप, भविष्य द्वेदी, साक्षी घारे, रिदम संचेती, अन्विदा अनिल, श्रेया डोमले, श्रेयस पटेल, अथर्व चाकणकर, प्रकाश प्रजापती, किरण गायकवाड यांनी ब्रॉंझपदकाचा मान मिळविला. बाळकृष्ण भंडारी, चंद्रकांत भोसले, राजेश पुजारी, देवेंद्र भूल, संदीप तळेगावकर यांनी या खेळाडूंना मार्गदर्शन केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.