बीजिंग – संयुक्त राष्ट्रातील आंतरराष्ट्रीय नियम कोणत्याही अपवादाशिवाय सर्वांनाच लागू व्हायला पाहिजेत. जागतिक नियम कोणीही एक देश ठरवू शकत नाही, अशा शब्दात चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी अमेरिकेला इशारा दिला आहे.
संयुक्त राष्ट्राचा अधिकार आपण मान्य केला पाहिजे. त्या माध्यमातून खऱ्या अर्थाने बहुस्तरिय यंत्रणा राबवली जायला पाहिजे, असे जिनपिंग म्हणाले. संयुक्त राष्ट्रामध्ये चीनचे स्थान कायदेशीर माध्यमातून पुन्हा समाविष्ट होण्याच्या आणि सुरक्षा परिषदेत नकाराधिकार प्राप्त देशांच्या यादीमध्ये समाविष्ट होण्याच्या 50 व्या वर्धापन दिनामित्त आयोजित कार्यक्रात ते बोलत होते.
आंतरराष्ट्रीय नियम हे 193 सदस्यांचा समावेश असलेल्या संयुक्त राष्ट्राच्या माध्यमातूनच तयार केले जायला पाहिजे. याला कोणताही अपवाद असता कामा नये. संयुक्त राष्ट्राच्या संपूर्ण रचनेची आणि कुटुंबाचीही काळजी घ्यायला पाहिजे. या संघटनेचे शोषण केले जायला नको, याची काळजी घ्यावी, असेही जिनपिंग म्हणाले. चीनने नेहमीच संयुक्त राष्ट्राचे श्रेष्ठत्व मान्य केलेले आहे. गेल्या 50 वर्षांमध्ये संयुक्त राष्ट्राला चीनकडून झालेले सहकार्य वृद्धिंगतच जाले आहे, असा दावाही जिनपिंग यांनी केला.
अमेरिका अणि चीनमधील संबंध सध्या व्यापार युद्ध, दक्षिण चीन समुद्रातील चीनची मुजोरी, हॉंगकॉंग आणि शिन्जियांग प्रांतातील मानवी हक्कांचे उल्लंघन आदी अनेक कारणामुळे खालावलेले आहेत.