आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्यापारी संकुल

“स्मार्ट सिटी’ अंतर्गत शहरात उभारणार
45 कोटींचा खर्च : रस्त्याच्या खाली शॉपिंग गाळे
दिल्लीच्या पालिका बाजार धर्तीवर पिंपळे सौदागरमध्ये साकारणार
भूमिगत व्यापार संकुलाचे फेरीवाला झोनप्रमाणे नियोजन
संकुलाच्या निम्म्या भागातील छतावरुन वाहतूक

पिंपरी – स्मार्ट सिटी अंतर्गत नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणून पिंपळे सौदागर येथील कोकणे चौक येथील नियोजित रिंगरोड अंतर्गत दिल्ली येथील भूमिगत पालिका बाजार व्यापार संकुलाच्या धर्तीवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्यापारी संकुल उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये 55 दुकाने उभारण्यात येणार आहेत. त्यामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे ब्रॅण्ड असलेल्या वस्तू, कंपन्या विक्रेत्यांचा समावेश असणार आहे.

पिंपरी-चिंचवड शहराचा दुसऱ्या टप्प्यात स्मार्ट सिटीत समावेश झाला आहे. त्यानंतर स्मार्ट सिटीअंतर्गत असलेल्या सुविधा नागरिकांना उपलब्ध करुन देण्याच्या कामांना वेग मिळाला आहे. स्मार्ट सिटीअंतर्गत सायकल योजना वाकड व पिंपळे सौदागर परिसरात राबविण्यात आली. त्यानंतर आता कोकणे चौकात भूमिगत व्यापार संकुलाचे फेरीवाला झोन प्रमाणे नियोजन केले आहे. त्यामध्ये 55 दुकाने असणार आहेत.

दुकानाचे क्षेत्रफळ 270 चौरस फूट असणार आहे. त्यामध्ये फुले, फळे, आईस्क्रिम, महिला प्रसाधने, केकशॉप, इलेक्‍ट्रॉनिक गॅझेट शॉप्स, बॅंक्वेटस्‌,या दुकानांचा समावेश असणार आहे. व्यापारी संकुलाच्या निम्या भागावर स्लॅबचे छत असणार आहे. त्यावरुन रिंगरोडमधील सेवा रस्त्यावरील वाहनांची वाहतूक होणार आहे. रस्त्याचे खाली शॉपिंग गाळे असणार असून, शॉपिंग व हॉकर्स झोनचा भाग मध्यभागी मोकळा असेल. त्याचबरोबरच मध्यभागी वर्ल्डक्‍लास लॅण्डस्केपिंग व स्ट्रीट फर्निचरचादेखील समावेश केला जाणार आहे.

या व्यापारी संकुलामध्ये उतरण्यासाठी अत्याधुनिक सरकत्या जिन्याचे नियोजन केले जाणार आहे. तसेच अत्याधुनिक छोटेखानी उद्यान व त्यामधील धबधबा या व्यापारी संकुलाच्या सौंदर्यात आणखी भर घालणार आहे. हे व्यापारी संकुल शहरातील एक नाविन्यपूर्ण आकर्षण असणार आहे. संकुलाच्या एका बाजूला कोपऱ्यातील जागेमध्ये सर्वोत्तम गॅझेट शॉप्स असणार आहे. अशा पद्घतीने खऱ्या अर्थाने पाश्‍चिमात्य देशाप्रमाणे शहरातील नागरिकांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्यापारी संकुल उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न असणार आहे.

मान्यतेनंतर अंतिम आराखडा करणार प्रकल्पासाठी अंदाजे 45 कोटी खर्च अपेक्षित आहे. तसेच हा प्रकल्प मान्यतेसाठी पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी संचालक मंडळापुढे सादर केला जाणार आहे. त्यामध्ये संचालकांच्या सूचनांचा अंतर्भाव करुनच अपेक्षित बदल स्विकारुन अंतिम आराखडा तयार केला जाणार आहे. सर्व सुविधा एकाच ठिकाणी स्मार्ट सिटीअंतर्गत घेतलेल्या चाचणीत पिंपळे सौदागर परिसरात स्मार्ट सिटी प्रकल्प राबविण्यास नागरिकांनी पसंती दिल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला. आंतरराष्ट्रीय व्यापारी संकुलासाराखा प्रकल्प देखील याच भागात राबविला जात आहे. आधीपासूनच उच्चभ्रू आणि विकसित असलेल्या एकाच परिसरातच सर्व सुविधा दिल्या जात असल्याचा आरोप शहराच्या अन्य भागातील नागरिकांनी केला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.