बगदाद – इराकमध्ये दहशतवादी हल्ला झाल्याच्या बातम्या नेहमीच येत असतात. गेल्या काही दिवसात इराकमध्ये अनेक दहशतवादी हल्ले झाले आहेत. नुकतेच इराकमध्ये एकाच दिवशी 21 दहशतवादी आणि मारेकऱ्यांना सोमवारी सामूहिकरित्या फाशी देण्यात आली. इराकच्या अंतर्गत मंत्रालयाने एक निवेदन जारी करत याबाबत माहिती दिली आहे.
दक्षिण इराकमधील नासिरियाच्या तुरूंगात या दहशतवादी आणि मारेकाऱ्यांना फाशी देण्यात आली. यामध्ये उत्तरेकडील तल-अफर शहरात दोन आत्मघाती हल्ल्यांमध्ये सहभागी असणाऱ्या आरोपींचा देखील समावेश आहे. या हल्ल्यांमध्ये 12 पेक्षा अधिक लोक ठार झाले होते.
मंत्रालयाने आपल्या निवेदनात फाशी दिलेल्या दहशतवादी आणि मारेकऱ्यांची ओळख उघड केलेली नाही, तसेच त्यांना कोणत्या गुन्ह्यांसाठी दोषी ठरवले आहे याबाबतची देखील माहिती त्यांनी दिलेली ऩाही.