हाफिजवर बंदी घालण्याचा इमरानचा डाव फोल; ‘एफएटीएफ’ च्या ग्रे लिस्टमध्येच राहणार पाकिस्तान

नवी दिल्ली – पुलवामा दहशतवादी हल्लानंतर जागतिक दबाव आलेल्या पाकिस्तानला आणखी एक झटका बसला आहे. पॅरिस येथे झालेल्या फाईनेंशियल एक्शन टास्क फोर्स च्या बैठकीत पाकिस्तान अजूनही ग्रे लिस्टमध्ये राहणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. म्हणजेच पाकिस्तानने गुरूवारी खतरनाक दहशतवादी हाफिज सईद याच्या जमात-उद्‌-दावा (जेयूडी) या संघटनेवर आणि फलाह-ए-इन्सानियत फाऊंडेशन (एफआयएफ) या संस्थेवर बंदी घालत पाकिस्तान ग्रे लिस्ट मधून बाहेर येण्याचा प्रयत्न करत होता तो पाकिस्तानचा प्रयत्न फसला गेला आहे.

एफएटीएफ कडून मिळालेला दिलासा हा कायम असू शकत नाही. पाकिस्तानच्या रेटिंग चा रिव्यू पुन्हा एकदा जून आणि आॅक्टोबर मध्ये घेतला जाणार आहे. एफएटीएफ ने पाकिस्तानला इशारा दिला आहे की, पाकिस्तानने दहशतवादाविरोधात कारवाई करण्याची वेळेची मर्यादा जर चुकवली तर त्यांना गंभीर परिणामाला सामोरे जावे लागेल. दरम्यान भारताकडून पाकला ब्लैक लिस्टमध्ये समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला जात होता तो यशस्वी होऊ शकला नाही.

एफएटीएफ ही संस्था दहशतवादाविरोधात लढणाऱ्या देशांना आर्थिक सहाय्य देते.  तसेच या संस्थेव्दारे दिले गेलेले रेटिंग (मानाकंन) चा परिणाम वर्ल्ड बँक, आयएमफ सारख्या अनेक संस्थावर पडतो. या संस्था मानाकंनानुसार कोणत्याही देशाला कर्ज पुरविते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)