बिकानेर – भारतातील प्रतिष्ठेच्या आंतरराष्ट्रीय मोटरस्पोर्टस स्पर्धा असलेल्या डेझर्ट स्टॉर्म 2019 ला बिकानेर येथून सुरुवात झाली. यात अनेक स्पर्धकांमध्ये आपल्याला चुरस पाहायला मिळेल. तीन वेळचा एपीआरसी चॅम्पियन गौरव गिल, संदीप सिधू, लाखपा त्सेरिंग आणि फिलिपोस मिथाई यांनी फोर व्हिलर ब्रिगेडमध्ये आघाडी घेतली. डकार रॅलीत सहभाग नोंदवणारे सी. एस. संतोष, आर. नटराज, ऐश्वर्या पी.एम. आणि इमरान पाशा दुचाकी विभागात वर्चस्व प्रस्थापित केले.
एफएमएससीआयच्या मान्यतेखाली होणाऱ्या डेझर्ट स्टॉर्म स्पर्धेचे हे 17 वे संस्करण आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून सर्वांचा कस लागणार आहे. या उन्हाळ्यात तापमान 50 अंश सेल्सिअसच्याही पुढे गेल्याने स्पर्धकांसाठी आव्हानात्मक असेल. स्पर्धेचे आयोजक असलेल्या नॉर्थन मोटरस्पोर्टस यांनी यावर्षी सकाळच्या व संध्याकाळच्या सत्रात विशेष गटाचे आयोजन केले असून जेणेकरुन स्पर्धकांना उन्हाचा त्रास कमी होईल.
स्पर्धेमध्ये नवी दिल्ली असून 130 स्पर्धक मंगळवारी रवाना झाले आहेत. त्यामुळे देशातील ही सर्वात मोठी स्पर्धा आहे. यासोबतच अनेकांसाठी कार व बाईक्स यांची चाचणी घेण्यासाठी हे सर्वोत्तम व्यासपीठ समजले जाते. महिंद्रा ऍडव्हेंचर, पोलारीस, फॉर्च्युनर (पहिल्यांदाच समावेश), जिप्सीसह टीव्हीएस आणि होंडा या सारख्या मोठ्या कंपन्या सहभागी होणार आहेत.
मोटरस्पोर्टसकडून आर्मीच्या संघाचे स्वागत करण्यात येणार आहे. या स्पर्धेत चारचाकी गटात दहा, तर दुचाकी गटात आर्मीचे तीन संघ असणार आहेत. चार दिवस चालणाऱ्या ही रॅली-रेड फॉरमॅटमध्ये असते. यामध्ये सुरुवातीला राजस्थानच्या थार डेझर्टमध्ये गेल्यानंतर जैसलमेरपर्यंत प्रवास करावा लागतो. यामध्ये वातावरणाचे मोठे आव्हान स्पर्धकांसमोर असते. त्यामुळे अंतिम रेषेपर्यंत पोहोचेपर्यंत अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो.
यावर्षी तीन गटांमध्ये 34 संघाचा (चालक व सह चालकासह) समावेश हा एक्ट्रीम गटात, 8 संघांचा समावेश (चालक व सह चालक) एनड्युअर गटात आणि 40 रायडर्स हे मोटो गटात असतील. एक्स्ट्रीम गटासाठी दहा विशेष स्तर असतील. मोटो गटासाठी हे स्तर सात असणार आहे. स्पर्धेतील सर्वात मोठे अंतर 200 किमी रन असेल. द एनड्युअर गटासह टीएसडी फॉरमॅटमध्ये ड्राईव्हर्सचा कस लागेल. आगामी चार दिवसांत चालक व रायडर्स जवळपास 2000 किमीचा टप्पा पार करतील.