आंतरराष्ट्रीय कबड्डी चषक : कॅनाडाला धूळ चारत भारताने पटकावले विजेतेपद

नवी दिल्ली : पंजाबमधील डेरा बाबा नानक येथील भगत सिंह स्टेडियम मध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय कबड्डी टूर्नामेंट-२०१९ च्या अंतिम सामन्यात मंगळवारी भारताने कॅनाडाचा पराभव करत विजेतेपद पटकावलं आहे. भारतीय संघास सुवर्णपदक आणि रोख रक्कम असं बक्षिस म्हणून देण्यात आले. भारताने टूर्नामेंटमध्ये ६४ आणि कॅनाडाने १९ गुण मिळविले.

मंगळवारी झालेल्या या स्पर्धेत कॅनाडा दुस-या राहिला. अमेरिका आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या सामन्यात अमेरिकेने इंग्लंडवर मात करत तिसरे स्थान पटकावले. अमेरिकाने ४२ आणि इंग्लंडने ३५ गुण मिळवले.

Leave A Reply

Your email address will not be published.