आळेफाटा- येडगाव (ता. जुन्नर) येथील येडेश्वर विद्यालयात शुक्रवारी (दि. 11) आंतरराष्ट्रीय बालिका दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी जनजागृती म्हणून प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले होते. नेतृत्व गुण अंगी असणाऱ्या विद्यार्थिनींचा यावेळी विद्यालयाच्या वतीने गौरव करण्यात आला.
या प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. एम. सोनवणे यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी विद्यालयाच्या उपशिक्षिका योगिता काशिद, ए. व्ही. जावळे, ए. एस. खरात यांनी बालिका दिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले. यावेळी सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस. ई. अभंग यांनी केले, तर एस. बी. कसार यांनी आभार मानले.