31 डिसेंबरपर्यंत आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंदच

नवी दिल्ली – करोनाचा प्रभाव पुन्हा वाढत असल्याचे दिसत असल्याचे केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय विमासेवा 31 डिसेंबर पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ऑक्‍टोबर महिन्यात ही सेवा 30 नोव्हेंबरपर्यंत बंद राहणार असल्याचे सांगितले होते. 

मात्र वाढता करोना प्रसार पाहता पुन्हा ही सेवा सुरू करण्याचा कालावधी वाढवण्यात आला आहे. नागरी विमान वाहतुक प्राधिकरणाने जारी केलेल्या परिपत्रकात याबाबत आदेश दिले आहेत. मात्र सक्षम अधिकाऱ्यांद्वारे “केस-टू-केस’ आधारावर निवडलेल्या मार्गांवर परवानगी आंतरराष्ट्रीय विमान प्रवासासाठीच्या उड्डाणांना परवानगी दिली जाऊ शकते, असेही या परिपत्रकात म्हटले आहे. 

करोनाच्या साथीमुळे देशात 23 मार्चपासून आंतरराष्ट्रीय विमान सेवेवर बंधने आणली आहेत. 16 जुलै रोजी केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालयाने देशांतर्गत विमान वाहतुकीला परवानगी दिली होती. आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक कधी सुरू होणार याकडे मात्र लक्ष लागून आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.