“अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यावर आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन

बीड: 1 ऑक्टोंबर 2018 रोजी मौलाना अबुल कलाम आझाद संशोधन केंद्र, औरंगाबाद येथे अण्णाभाऊ साठे यांच्या ‘विचारांची ओळख व त्यांच्या साहित्यावर संशोधन व्हावे या उद्देशाने ‘सत्यशोधक अण्णाभाऊ साठे : एक मानवतावादी साहित्यीक’ या विषयावर एक दिवसीय आंतरविद्याशाखेच्या आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती चर्चासत्राचे आयोजक सौ. अनुप्रिता मोरे यांनी दिली.
या चर्चासत्राचे उद्घाटन कॉ.मेघाताई पानसरे यांच्या शुभ हस्ते होणार आहे. विचारमंचावर प्रमुख पाहुणे अण्णाभाऊंचे नातु सचिन साठे तर विचारवंत प्रो. भगवान वाघमारे हे असणार आहेत. प्रमुख उपस्थिती मध्ये दिग्दर्शक बबन अडागळे, उपकुलसचिव डॉ.दिगांबर नेटके, अण्णाभाऊ साठे अभ्यासन केंद्र पुणे येथील डॉ.सुनील भंडगे, प्रा.भगवान वाघमारे, प्रा.दिलीप अर्जुने व सुप्रसिद्ध गझलकार डॉ.मुकूंद राजपंखे यांचा सहभाग आहे.
अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यावर व विचारांवर प्रकाश टाकण्यासाठी साहित्यीक तथा विचारवंत डॉ.शरद गायकवाड हे बिजभाषक म्हणून उपस्थित राहणार आहेत. दुपारच्या परिसंवादात बोलण्यासाठी डॉ.बळीराम गायकवाड,डॉ.प्रमोद गारोडे डॉ.लक्ष्मण जोगदंड, डॉ.गणेश मोहीते व डॉ.विष्णू पाटील यांचा सहभाग असणार आहे.समारोप सत्रातील प्रमुख पाहुणे डॉ.मच्छिंद्र सकटे हे अण्णाभाऊंचा जिवनपट सविस्तरपणे उलगडणार आहेत तर अध्यक्षीय समारोप प्राचार्य अरुण दळवे हे करणार आहेत.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)