पालीवरील महितीपटाला आंतरराष्ट्रीय पुरस्कार

नेचर इन फोकस फिल्म फेस्टिव्हलमध्ये घेतली दखल

पुणे – पश्‍चिम घाटात आढळणाऱ्या फॅन थ्रोटेड लिझर्ड (माळसरडा) या पालीवरील माहितीपटाला आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. पर्यावरण अभ्यासक प्रणित बोरा, धीरज झंवर आणि स्थानिक संशोधक यांनी या माहितीपटाची निर्मिती केली आहे.

पश्‍चिम घाट परिसरातील साप, सरडा, पालींच्या विविध प्रजाती आढळतात. याबाबत अनेक अभ्यासकांकडून संशोधनही आणि अभ्यासही केला जातो.

मात्र, अनेकदा ही माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळेच प्रणित बोरा, धीरज झंवर यांनी सातारा येथील चाळकेवाडी परिसरात आढळणाऱ्या फॅन थ्रोटेड लिझर्ड या पालीच्या जीवनचक्राचा अभ्यास करून आम्ही त्यावर एक छोटा माहितीपट बनविला आहे. या माहितीपटाला “नेचर इन फोकस फिल्म फेस्टिव्हल 2020′ या महोत्सवात आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

या पुरस्कारामुळे वन्यजीव संशोधनाबाबत काम करण्याची प्रेरणा मिळाली आहे. तसेच या संशोधनादरम्यान आम्हाला काही पर्यावरणाला हानी पोहोचेल, असे प्लॅस्टिक, जीवांना इजा होईल अशा ग्लासचे तुकडे तसेच लागणारे वणवे, अशा काही अडचणी निदर्शनास आल्या, त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठीही आम्ही लोकांचे प्रबोधन करण्याचे काम करत आहोत, अशी प्रतिक्रिया बोरा यांनी व्यक्त केली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.