मुंबई : मागील एक वर्षापासून जगभरात करोना संसर्ग धुमाकूळ घालत आहे. भारतात देखील करोनाने कहर केला आहे. गेल्यावर्षी देशात करोनामुळं घाईघाईने लॉकडाऊन करण्यात आलं होतं. त्यामुळे गोरगरिबांचे फार हाल झाले. अनेकांनी अक्षरश: हजारो किमी चालत आपलं गाव गाठलं. मात्र त्याचवेळी अभिनेता सोनू सुद गरिबांच्या मदतीसाठी धावून आला होता.
अनेक चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारणारा सोनू कोरोना संसर्गाच्या काळात केलेल्या मदतीमुळे सर्वांसाठी खराखुरा हिरो बनला आहे. त्याच्या याच कार्याची दखल घेत फोर्ब्सने सोनुला लीडरशिप अवॉर्ड देऊन २०२१ सन्मानीत केलं आहे. याबद्दल सोनू सुदने फोर्ब्सचे आभार मानले आहे.
Humbled 🙏 pic.twitter.com/Y4aESniX7K
— sonu sood (@SonuSood) March 25, 2021
गेल्या वर्षी लॉकडाऊनमुळे हातवर पोट असणाऱ्या मजुरांचे अतोनात हाल झाले. त्यावेळी सोनु सुद धावून आला. त्याने मुंबईसह इतर ठिकाणी अडकलेल्या मजुरांना त्यांच्या मुळ गावी परतण्यासाठी मदत केली. तसेच मजुरांच्या खाण्यापिण्याची सोय केली. त्याच्या या कार्याची दखल फोर्ब्सने घेतली आहे.