शारीरिक सौंदर्याबरोबर आंतरिक सौंदर्य महत्वाचे – मिसेस इंडिया शुंभागी शिंत्रे

बुद्धीबळ स्पर्धा : खुल्या गटात सोहम खासबारदार ठरला विजेता...

इस्लामपूर : “बौद्धिक क्षमता विकसित करण्यात बुद्धीबळ खेळ उपयुक्त आहे. विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत खेळाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. शाररिक सौंदर्याबरोबर आंतरिक सौंदर्य चांगले हवे असे मत मिसेस इंडिया इंटरनॅशनलच्या विजेत्या शुभांगी शिंत्रे यांनी व्यक्त केले. येथे ऑल इंडिया सिनेवर्कस असोसिएशन तर्फे शिवजयंतीनिमित्त आयोजित केलेल्या बुद्धिबळ स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात त्या बोलत होत्या.

युवक कॅांग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस विजय पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत व महिला काॅंग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड.मनिषा रोटे यांच्या अध्यक्षतेखाली बक्षीस समारंभ झाला. खुल्या गटात सोहम खासबारदार ( कोल्हापूर) याने,१६ वर्षाखालील गटात शंतनू बिळासकर तर १४ वर्षाखालील गटात आदित्य कोळी यांनी विजेतेपद पटकावले. येथील जयंत पाटील सभागृहात या स्पर्धा झाल्या. सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील ६५ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टनन्सचे पालन, मास्क वापरत स्पर्धा झाल्या.

खुल्या गटातील उपविजेता- कौस्तुभ गोटे,तन्मय पवार, श्रद्धा कदम, मुद्दसर पटेल, अथर्व चव्हाण, नितीन राठोड, वेदांत कोरे,मारुती नरुटे यांनी यश मिळवले. १४ वर्षाखालील गटातील उपविजेता आर्यन गावडे, तृतीय -आयुश घाटे. १६ वर्षाखालील गटातील उपविजेता रुची शिंदे, तृतीय नीरज देसावळे, याच गटातील रजत नंरदेकर याने खुल्या गटात ६ गुण मिळवत दुसरा क्रमांक पटकावला. सकाळच्या सत्रात प्रकाश पब्लिकचे प्राचार्य मधुकर नायर यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले.

ॲड मनीषा रोटे म्हणाल्या,”कोरोनाच्या परिस्थिती मुलांची मानसिकता जपायला ही स्पर्धा उपयुक्त ठरेल.”ऑल इंडिया सिनेवर्करस असोसिएशनचे युवा अध्यक्ष प्रज्योत रोटे म्हणाले,” इस्लामपूर शहरात बऱ्याच वर्षांपासून बुद्धीबळ स्पर्धा झाल्या नव्हत्या. कोरोनाच्या संकटांची अडचण असतांना आम्ही सर्व स्पर्धकांची काळजी घेत स्पर्धा यशस्वी केल्या.” उपाध्यक्ष सलमान पठाण यांनी आभार मानले. श्रद्धा कदम हिने सूत्रसंचालन केले. अध्यक्ष कुणाल ओसवाल. कोल्हापूर अध्यक्ष हीतेन पोरवाल यांनी संयोजन केले. या स्पर्धेसाठी बुद्धीबळ प्रशिक्षक रवी बावडेकर यांचे मार्गदर्शन लाभले. सुजितराव चंदू चाहवाले यांचे सहकार्य लाभले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.