कौतुकास्पद! खिशात ३ रुपये नसतांना, सापडलेले ४० हजार केले परत

सातारा: खिशात केवळ ३ रुपये असताना, बस स्टॉपवॉर सापडलेले ४० हजार रुपये मालकाला परत करून सातारा येथील धनाजी जगदाळे यांनी समाजापुढे प्रामाणिकपणाचे उत्कृष्ट उदाहरण ठेवले आहे. शिवाय त्यांनी बक्षीस म्हणून रु १००० नाकारत घरी परतण्यासाठी फक्त ७ रुपये स्वीकारले.

महाराष्ट्र पोलिसांनी धनाजी जगदाळे यांचे आभार मानले असून अशा प्रामाणिक नागरिकांना आमचा सलाम आहे, असे ट्विट केली आहे. विशेष म्हणजे जगदाळे यांनी बक्षीस म्हणून दिलेले १००० सुद्धा नाकारले. त्यामुळे त्यांच्या स्वाभिमानी स्वभावाचा सुद्धा प्रत्यय येतो.

Leave A Reply

Your email address will not be published.