मुंबई : अभिनेता राजकुमार राव आणि भूमी पेडणेकर याचा नवा कोरा ‘बधाई हो’ फ्रँचायझी ‘बधाई दो’ सोबत मनोरंजनासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर लाॅंच झाला असून चाहत्याकडून ट्रेलरला चांगलीच पसंती मिळते आहे. येत्या 11 फेब्रुवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
‘बधाई दो’ मध्येही तुम्हाला ‘बधाई हो’ सारख्याच विनोदाची रेलचेल पाहायला मिळेल. ‘बधाई हो’ मध्ये मध्यमवयीन जोडप्याचे प्रेम कसे मजेदार प्रसंगातून जाते याचे चित्रण करते, तर बधाई दो हे एका असामान्य नातेसंबंधाविषयी आहे आणि कॉमेडी ऑफ़ एरर सिचुएशन विनोदाद्वारे त्याची कथा मांडतो.
हर्षवर्धन कुलकर्णी दिग्दर्शित हा चित्रपट या वर्षी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार्या बहुप्रतिक्षित कौटुंबिक मनोरंजनपटांपैकी एक आहे. राजकुमार आणि भूमी व्यतिरिक्त, यामध्ये सीमा पाहवा, शीबा चड्ढा, लवलीन मिश्रा, नितीश पांडे, शशी भूषण यांसारखे दिग्गज कलाकार दिसणार आहेत, जे कथा पुढे नेण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. अक्षत घिलडियाल आणि सुमन अधिकारी यांनी याचे लेखन केले आहे.