अल्पबचत योजनांवरील व्याजदर ‘जैसे थे’च, तो आदेश चुकून निघाला

अर्थमंत्र्यांनी केले स्पष्ट

नवी दिल्ली – अल्पबचत योजनांवरील व्याजदरात कपात करण्याचा निर्णय अर्थ मंत्रालयाकडून रद्द करण्यात  आला आहे. नव्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच सर्वसामान्यांना झटका देत अर्थ मंत्रालयाकडून अल्पबचत बचत योजनांवरील व्याजदरात कपात जाहीर करण्यात आली होती. मात्र अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी हा आदेश चुकून निघाल्याचे सांगत व्याजदर ‘जैसे थे’च राहतील, असे  स्पष्ट केले आहे. निर्मला सीतारमन यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे.

अल्पबचत योजनांवरील व्याजदरात कपातीचा काय होता निर्णय?
केंद्र सरकारने बुधवारी अल्पबचत योजनांवरील व्याजदरात कपात केली. नवे दर 1 एप्रिल ते 30 जून 2021 या कालावधीसाठी लागू असतील. सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी (पीपीएफ) वरील व्याजदरात 0.7 टक्का कपात करण्यात आली. आता पीपीएफवर 6.4 टक्के व्याज मिळेल.

नॅशनल सेव्हिंग्ज सर्टिफिकेटवर 0.9 टक्का कमी म्हणजे 5.9 टक्के इतके व्याज प्राप्त होईल. ज्येष्ठ नागरिक बचत योजनेवरील व्याजही 0.9 टक्‍क्‍याने घटवण्यात आले आहे. ते आता 6.5 टक्के इतके झाले आहे. बचत ठेवींवर यापुढे 4 टक्‍क्‍यांऐवजी 3.5 टक्के व्याज उपलब्ध होईल. सुकन्या समृद्धी योजनेवरील व्याजदर 0.7 टक्‍क्‍याने घटून 6.9 टक्के झाले आहे. किसान विकास पत्रावर आता 6.9 टक्‍क्‍यांऐवजी 6.2 टक्के व्याज मिळेल.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.