भविष्यनिर्वाह निधीवरील व्याजदर कमी होणार

सरकारी रोख्यावरील परतावा घटल्याचा परिणाम

मुंबई – सरकारी रोख्यांवरील परतावा आणि अल्पबचत योजनावरील कर्जाचे व्याजदर वेगाने कमी होत असल्यामुळे पुढील आठवड्यात भविष्यनिर्वाह निधीवरील व्याजदरातही कपात होण्याची शक्‍यता आहे. सध्याच्या आकडेवारीनुसार भविष्यनिर्वाह निधीवरील व्याजदर हे 46 वर्षात प्रथमच 7 टक्‍क्‍यांच्या खाली जाऊ शकतात असे बोलले जात आहे.

अल्पबचतीवरील व भविष्यनिर्वाह निधीवरील व्याजदर सरकारच्या रोख्यावरील परताव्याशी संलग्न केलेले असतात. हे व्याजदर रोज ठरत नाहीत, तर दर तिमाहीच्या सुरुवातीला ठरतात. एप्रिल ते जून या तिमाहीसाठी हा व्याजदर 7.1 टक्‍के होता. मात्र पुढे तो यापेक्षा कमी होण्याची शक्‍यता आहे.

एप्रिलच्या सुरुवातीला भविष्यनिर्वाह निधीवरील व्याजदर 7.9 टक्‍क्‍यांवरून 7.1 टक्‍के करण्यात आले होते. ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या बचत योजनावरील व्याजदर 8.6 टक्‍क्‍यांवरून 7.4 टक्के करण्यात आले होते. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रावरील व्याजदर 7.9 टक्‍क्‍यावरून 6.8 टक्के करण्यात आले होते. एकूणच व्याजदर कमी होत असल्यामुळे ज्या प्रमाणात बचत योजनावरील व्याजदर कमी होत आहेत त्या प्रमाणात भविष्यनिर्वाह व्याजदर कमी होण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.