पुणे – बॅंक ऑफ महाराष्ट्रने एक वर्ष मुदतीच्या कर्जावरील व्याजदरात म्हणजे एमसीएलआरमध्ये 0.10 टक्के कपात केली आहे. या दराच्या आधारावर बॅंकेच्या विविध कर्जावरील व्याजदर आकारला जातो. या निर्णयाची अंमलबजावणी 7 जूनपासून सुरू झाली.
बॅंकेने ओव्हरनाईट एमसीएलआर 0.05 टक्क्यांनी कमी करून 8.15 टक्के केला आहे. तर तीन महिन्यासाठीचा एमसीएलआर 0.05 टक्क्यांनी कमी करून 8.40 टक्के इतका केला आहे.