स्टेट बॅंकेची नव्या पद्धतीने व्याज आकारणी

नवी दिल्ली – भारतीय स्टेट बॅंक (एसबीआय) 1 मे पासून आपल्या नियमांत बदल करणार आहे. याचा फायदा एसबीआयच्या ग्राहकांना होणार आहे. एसबीआय आपले लोन (कर्ज) आणि डिपॉझिट रेट थेट रिझर्व्ह बॅंकेच्या रेपो रेटसोबत जोडणार आहे. यामुळे ग्राहकांना कर्ज स्वस्त दरात उपलब्ध होईल. मात्र, त्याचसोबत 1 मे पासून बॅंकेच्या बचत खात्यांवर मिळणाऱ्या व्याजदरात कपात करण्यात येणार आहे.

आतापर्यंत बॅंका मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड बेस लेंडिंग रेट (एमसीएलआर)च्या आधारावर व्याज दर निश्‍चित करतात. त्यामुळे रेपोत करण्यात आल्यानंतर देखील बॅंकांकडून दिलासा मिळत नव्हता. मात्र, एसबीआयने उचललेल्या या पावलामुळे ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे.

एसबीआय आपले व्याजदर थेट रेपो रेटसोबत जाणार आहे. त्यामुळे रिझर्व्ह बॅंकेने रेपो रेटमध्ये बदल केल्यानंतर व्याजदरात थेट बदल होतील. तसेच एसबीआयच्या ग्राहकांना 30 लाखांपर्यंतच्या कर्जावर 0.10 टक्‍के व्याजदर आता कमी द्यावा लागणार आहे. सध्या 30 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाचे दर हे 8.60 ते 8.90 टक्‍क्‍यांपेक्षा कमी आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.