Intercontinental Cup 2024 Football :- सीरिया संघाने भारताला 3-0 असे पराभूत करताना इंटरकॉन्टिनेंटल चषक फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद राखले. इंटरकॉन्टिनेंटल चषक फुटबॉल स्पर्धेत प्रथमच सीरिया संघाला विजेतेपद मिळाले आहे. यापूर्वी भारताने दोन वेळा या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते.
जीएमसी बालयोगी एथलेटिक्स मैदानावर झालेल्या लढतीत सीरियाच्या महमूद अल अस्वादने 7 व्या मिनिटाला गोल करताना सीरियाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर मात्र निर्धारित वेळेत गोल करण्यात भारतीय संघाला अपयश आले. लढतीतील ७७ व्या मिनिटाला दालेहो मोहसेन एरंडस्टने गोल करताना आघाडी 2-0 ने वाढवली. त्यानंतर पाब्लो सबागने 96 व्या मिनिटाला गोल करून संघाला 3-0 असे विजयी केले.
सीरिया संघाने या पूर्वीच्या लढतीत मॉरिशस संघाला 2-0असे पराभूत करताना विजयी आगेकूच केली होती. भारत आणि मॉरिशस संघांदरम्यान झालेली लढत गोलशून्य बरोबरीत राहिली होती. त्यामुळे भारताचे अंतिम फेरीत स्थान निश्चित झाले होते.
भारताने 2018 व 2023 साली स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते. सीरियासंघाने 2019 मध्ये या स्पर्धेत तिसरे स्थान मिळविले होते. त्यानंतर मात्र सीरिया अंतिम फेरीत पोहचला नव्हता. यावर्षी मात्र सीरियाने विजेतेपदाला गवसणी घातली.