आंतर महाविद्यालयीन शिक्षक क्रीडा स्पर्धा : ‘पीआयसीटी’ला सर्वसाधारण विजेतेपद

पुणे – पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्यूटर टेक्‍नॉलॉजी (पीआयसीटी) महाविद्यालयाने 48 गुण मिळवून येथे पार पडलेल्या एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणेतर्फे आंतर महाविद्यालयीन शिक्षक क्रीडास्पर्धा 2019 “टीचर्स लीग’चे सर्वसाधारण विजेतेपद पटकावले.

पुणेच्या मॉडर्न कॉलेजला 47 गुणांवर उपविजेतेपदी समाधान मानावे लागले. पीआयसीटीच्या संघाला करंडक व 51,000 हजार रुपयांचे रोख बक्षिस देण्यात आले. दि. 24 ते 29 एप्रिल 2019 दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत एकूण 60 महाविद्यालयांचे 600 स्पर्धक सहभागी झाले होते. महाराष्ट्र क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुरेंद्र भावे यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. अध्यक्षस्थानी माईर्स एमआयटीचे अधिष्ठाता प्रा. शरदचंद्र दराडे-पाटील हे होते.

सुरेंद्र भावे म्हणाले, शिक्षकांच्या स्पर्धा भरविल्या जात आहेत ही एक जागतिक पातळीवरील संकल्पना आहे. शिक्षकांच्या स्वास्थ्यासाठी जागृती मोठ्या प्रमाणावर होणे गरजेचे आहे. शिक्षक जर शारीरिकदृष्ट्‌या मजबूत झाला तर विद्यार्थीही त्याचप्रमाणे घडतील. आज पबकडे जाणाऱ्या तरुणांचा ओघ वाढत आहे. त्याला आळा घालण्यासाठी शिक्षकांनी तरुणांना खेळाकडे वळविण्याची गरज निर्माण झाली आहे. या टीचर्स लीगमध्ये महिला शिक्षकांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर पहावयास मिळाला. भविष्यात या स्पर्धा राष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचतील व यातूनच चांगले खेळाडू निर्माण होतील. प्रा.पी.जी धनवे यांनी प्रास्ताविक केले. रोहित पाटील व ईश्‍वरी पाटील यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. श्रीहरी होनवाड यांनी आभार मानले.

याप्रसंगी भारतीय कुस्ती संघाचे प्रशिक्षक विलास कथुरे, एमआयटी डब्ल्यूपीयूचे प्रोहोस्ट डॉ. श्रीहरी होनवाड, एमएमसीसी महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ.एम.आर.गायकवाड, नारायणगांव येथील एमसीएस महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ. गिरीश ढमाले, एजीसीच्या क्रीडा संचालिका डॉ. आशा बेंगळे व एमआयटी डब्ल्यूपीयूचे क्रीडा संचालक प्रा.डॉ. पी. जी. धनवे हे उपस्थित होते.

सविस्तर निकाल

टेबल टेनिस (महिला) – विजेता – शुभदा कुलकर्णी (गव्हर्नमेंट पॉलिटेक्‍निक कॉलेज, पुणे), टेबल टेनिस (पुरुष) – विजेता – अशोक कलांबे (गव्हर्नमेंट सायन्स कॉलेज, गडचिरोली)
बॅडमिंटन (पुरुष) – विजेता – अविनाश सिंग (पुना कॉलेज, पुणे), बॅडमिंटन (महिला) विजेता – माधवी मेट्‌से (मॉडर्न कॉलेज, पुणे)
थ्रो बॉल (महिला) – विजेता – मॉडर्न कॉलेज, शिवाजीनगर, पुणे
व्हॉलिबॉल (पुरुष) – विजेता – एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे
क्रिकेट (महिला) – विजेता – पीआयसीटी, पुणे,
क्रिकेट (पुरुष) – विजेता – झील कॉलेज, पुणे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.