कोल्हापूर(प्रतिनिधी) – गर्दीचा फायदा घेऊन मोबाईल चोरणाऱ्या आंतरराज्य टोळीला कोल्हापूर पोलिसांनी गजाआड केले आहे. त्यांच्याकडून 34 मोबाईल चोरीचे गुन्हे उघडकीस आणले असून तीन लाख 77 हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याप्रकरणी कोल्हापूर पोलिसांच्या क्राईम ब्रँच ने कर्नाटक मधील एकूण पाच आरोपी निष्पन्न झाले असून त्यातील तीन आरोपींना कोल्हापूर पोलिसांनी अटक केली आहे. हे तिघे आरोपी कोल्हापूरातील आठवडी बाजार, बस स्थानक परिसर तसेच गर्दीच्या ठिकाणी मोबाईल चोरी करून कर्नाटकात घेऊन जात होते. तिथे एका दुकानात मोबाईल लॉक काढून पुढे विक्री करत होते. याप्रकरणी अनिल शिवाप्पा बंडीवडर, प्रदीप लक्ष्मण भद्रावती, सतीश बसवराज भोई यांना अटक केलीय.
हे तिघेही कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील रहिवासी आहेत. त्यांच्याकडून कोल्हापूर जिल्ह्यातील अकरा पोलीस स्टेशन मध्ये 34 मोबाईल चोरीचे गुन्हे दाखल असून त्यांच्याकडून 34 मोबाईल आणि लॅपटॉप सुद्धा पोलिसांनी जप्त केला आहे.
या आंतरराज्य टोळीकडून आणखी मोबाईल मिळतील अशी शक्यता पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली आहे. ही कारवाई कोल्हापूर क्राइम ब्रांचचे पोलिस निरीक्षक प्रमोद जाधव यांच्या पथकाने केली आहे