आंतर रेल्वे मैदानी स्पर्धेस वीस ऑगस्टपासून प्रारंभ

पुणे – ऑलिंपिकपटू ललिता बाबर, आंतरराष्ट्रीय खेळाडू सुधा सिंग, चिंता यादव, पारूल चौधरी,रिटू मॅथ्यु, सचिन पाटील यांच्यासह अनेक नामवंत खेळाडू 85 व्या अखिल भारतीय आंतर रेल्वे मैदानी स्पर्धेत सहभागी होणार आहेत. ही स्पर्धा 20 ते 22 ऑगस्ट दरम्यान आयोजित केली जाणार आहे.

पुणे विभागीय क्रीडा समितीच्या सहकार्याने मध्य रेल्वेने शिवछत्रपती क्रीडानगरीत या स्पर्धेच्या संयोजनाची जबाबदारी स्वीकारली आहे. या स्पर्धेत रेल्वेच्या सर्व विभागातील तसेच रेल्वे उत्पादन कारखान्यांमधील 350 खेळाडूंचा सहभाग निश्‍चित झाला आहे.

या स्पर्धेच्या वेळी माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू पी.टी.उषा, बहादूरप्रसाद, रोजा कुट्टी, के.एम.बीनामोल, एम.डी.वलसम्मा, संजयकुमार राय, रचिता मिस्त्री, गुरूबन्स कौर आदी ज्येष्ठ खेळाडू उपस्थित राहणार आहेत. या स्पर्धेत कमी व मध्यम अंतरांच्या शर्यतींबरोबरच गोळाफेक, थाळीफेक, भालाफेक, हातोडाफेक, लांब उडी, उंच उडी, पोल व्हॉल्ट, तिहेरी उडी आदी क्रीडाप्रकारांचा समावेश आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×