पुणे – युवा खेळाडूंमधील नैपुण्य शोधण्यासाठी पुणेरी पलटणतर्फे आजपासून राज्य स्तरावर आंतर क्लब कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. त्यामध्ये 45 संघांनी भाग घेतला आहे. ही स्पर्धा तीन टप्प्यात होणार असून पहिल्या टप्पा आज औरंगाबादला सुरू होईल.
औरंगाबादमधील प्रोझोन मॉलमध्ये 17 व 18 ऑगस्ट रोजी सामने होतील. त्यानंतर नाशिक व पुणे येथे अनुक्रमे दुसरी व तिसरी फेरी होणार आहे. या स्पर्धेतून पुढच्या मोसमाकरिता 40 ते 50 खेळाडूंची निवड केली जाणार आहे. या खेळाडूंसाठी सराव शिबिरही घेतले जाणार आहे. निवडलेल्या खेळाडूंना स्थानिक स्पर्धांमध्ये भाग घेण्याची संधी दिली जाईल.