Heatwave Alert : उत्तर भारतासह देशभरात तीव्र उष्णतेची लाट पसरली आहे. देशातील अनेक राज्ये तीव्र उष्णतेने पोळली आहेत. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरियाणापासून ते राजस्थान आणि महाराष्ट्रापर्यंतच्या अनेक जिल्ह्यांतील उष्णतेने कहर केला आहे. (Heatwave Alert) उत्तर प्रदेशातील बांदा हे ४६.७०८ तापमानासह सर्वात उष्ण शहर ठरले. त्यापाठोपाठ झाशीमध्ये ४४.६०८ आणि प्रयागराजमध्ये ४४.५०८ तापमान होते. याशिवाय, लखनौमधील तापमान ४१.६०८ होते. (Heatwave Alert) येत्या काही दिवसांत सर्व मैदानी राज्यांमध्ये, विशेषतः हरियाणामध्ये तापमानात पुन्हा एकदा वाढ दिसून येईल आणि उष्णतेची लाट अधिक तीव्र होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. (Heatwave Alert) हरियाणामध्ये २४ तासांत २.८ अंश सेल्सिअस तापमान वाढ झाली आहे. हरियाणाच्या ८ जिल्ह्यांमध्ये तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त होते. रोहतकमध्ये सर्वाधिक तापमान ४२.१ अंश सेल्सिअस होते. (Heatwave Alert) भारतीय हवामान विभागाने सोमवारी मध्य प्रदेशातील ५५ पैकी ३१ जिल्ह्यांसाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी केला आहे. यात ज्यात ग्वाल्हेर, उज्जैन आणि जबलपूरचा समावेश आहे. (Heatwave Alert) अधिकृत आकडेवारीनुसार, इंदूर आणि सागर येथे किमान तापमान २९ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. जबलपूरमध्ये ते २८.८ अंश सेल्सिअस होते, तर दतिया आणि गुना येथे २८.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. (Heatwave Alert) आंध्र प्रदेशातही राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने श्रीकाकुलम, विजयनगरम आणि पार्वतीपुरम मान्यम या जिल्ह्यांमधील २८ मंडळांवर तीव्र उष्णतेच्या लाटेचा परिणाम होण्याची शक्यता आहे, तर आणखी २१ मंडळांमध्ये उष्णतेच्या लाटेसारखी परिस्थिती निर्माण होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. शाळांच्या वेळेत बदल नवी दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान, हरियाणा आणि तेलंगणाच्या काही भागांमध्ये तापमान आधीच ४५ अंश सेल्सिअसच्या वर पोहोचले आहे. यामुळे प्रशासनाला शाळा नियोजित वेळेपेक्षा लवकर बंद कराव्या लागल्या आहेत किंवा वर्ग सकाळच्या सत्रात घ्यावे लागले आहेत. (Heatwave Alert) हे निर्णय अनेक राज्यांमधील सीबीएसई, आयसीएसई तसेच सरकारी आणि खासगी शाळांना लागू होतात. दरम्यान, तापमान सतत वाढत असल्याने दुपारच्या कडक उन्हाच्या वेळी मुलांनी आणि ज्येष्ठ नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असा सल्ला अधिकाऱ्यांनी दिला आहे. (Heatwave Alert)