नवी दिल्ली : देशात कोरोनाबाधीतांचा आकडा वाढतच आहे. हरियाणा सरकारने पत्रकारांसाठी मोठी घोषणा केली आहे. रिपोर्टींग करणाऱ्या सर्व पत्रकारांना १० लाख रुपयांचा विमा देण्याचा निर्णय हरियाणा सरकारने घेतला आहे.
राज्य सरकार ने कोरोना वायरस महामारी के दौरान रिपोर्टिंग करने वाले सभी पत्रकारों को 10 लाख रुपये का बीमा देने का फैसला किया है: हरियाणा के मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर (फाइल फोटो) #haryana #COVID19 pic.twitter.com/AWanvsjGVg
— ANI_HindiNews (@AHindinews) April 23, 2020
दरम्यान, राज्यात सार्वधिक कोरोना रुग्ण मुंबईत आढळले आहे. यात धक्कादायक बाब म्हणजे मुबंईत ५३ पत्रकारांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. त्यामुळे पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मुंबई महापालिकेने १६८ पत्रकारांची कोरोना चाचणी केली होती.
त्यापैकी ५३ पत्रकारांना कोरोनाची लागण झाली आहे. मुंबई महापालिकेने, टीव्ही इलेक्ट्रॉनिक जर्नलिस्ट असोसिएशनच्या विशेष शिबिरामध्ये १६८ पत्रकारांची चाचणी केली होती.
दरम्यान, केंदीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत देशभरात २१ हजार ३९३ कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. तर ६८१ कोरोनाबाधितांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. तसेच मागील २४ तासात १ हजार ४०९ कोरोनाबाधित रुग्ण देशात सापडले आहेत.