विमा, हेल्थकेअर आणि औषधे; पोर्टफोलियोला द्या बूस्टर डोस (भाग-२)

विमा, हेल्थकेअर आणि औषधे; पोर्टफोलियोला द्या बूस्टर डोस (भाग-१)

आता वैयक्तिक अपघात विम्यात रस्ते-अपघातापासून ते सर्पदंशापर्यंत कशानेही अपंगत्व आल्यास अथवा ती व्यक्ती काम करायचे थांबल्यास एक रक्कम त्याला किंवा त्याच्या कुटुंबीयांना मिळते, जी रक्कम त्याच्या नोकरीत पूर्ववत होईपर्यंतच्या घरखर्चास हातभार लावू शकते. अशी रक्कम ही साधारणपणे त्या व्यक्तीच्या सहा ते बारा महिन्यांच्या पगाराएवढी असावी.

गाडीचा इन्शुरन्स असल्याशिवाय नवीन गाडीची नोंदणी देखील होत नसल्यानं असा विमा आपसूकच होऊन जातो परंतु, अशा विम्याची मुदत काळाच्या ओघात संपल्यानंतर त्यांचं नूतनीकरण करणंही गरजेचं आहे. कमीतकमी, आपण गाडी चालवत असतां, कोणाला काही इजा झाल्यास त्याची नुकसान भरपाई या विम्यातून होत असते व त्यामुळं आपल्या खिशाला बसणारा भुर्दंड वाचणार असतो. आजकाल अगदी ऑनलाईन पद्धतीनं देखील अशा प्रकारच्या विम्याची कार्यवाही करता येऊ शकते.

आता या यादीमधील शेवटची गोष्ट म्हणजे घराचा विमा. वरवर पाहता अत्यंत महत्त्वाची अशी ही बाब असूनही अनेक लोक या बाबतीत जागरूकता दाखवताना दिसून येत नाहीत. परंतु, राहत्या घराला झालेलं नुकसान एका मिनिटांत तुम्हाला बेघर करू शकतं, मग त्याचं कारण पंचमहाभूतांपैकी कोणतेही असो. प्रत्येकजण स्वतःचं घर बांधण्यात संपूर्ण आयुष्य घालवतो, हो शब्दशः घालवतोच, पूर्ण आयुष्याची कमाई अथवा पगारातील प्रचंड हिस्सा, संपूर्ण बचत किंवा आयुष्यातील उमेदीच्या वर्षात केलेली मेहनत. आणि एखाद्या अतर्क्‍य घटनेनंतर होत्याचं नव्हतं झाल्यावर शब्दशः पुन्हा घर बांधणं ह्या कल्पनेनंच पहिले तीन विमे नाही वटवावे लागले म्हणजे मिळवलं ! विनोदाचा भागसोडल्यास, असा विमा असणं देखील आवश्‍यक आहे.

आता असं हे विमा क्षेत्रं आपल्या जीवनाचा एक अंग बनून राहिलंय आणि आजच्या तरुण भारताची लोकसंख्या पाहिल्यास अशा कंपन्यांना येणाऱ्या वर्षांत सुगीचे दिवस येणार हे मात्र नक्की. कारण प्रत्येक तरुण अशा विम्यांबाबत जागरूकता दर्शवतोय. अशा क्षेत्रावर नजर टाकल्यास कांही मोजक्‍याच कंपन्या या नोंदणीकृत झालेल्या आढळतात ज्यातून गुंतवणुकीची संधी उपलब्ध होऊ शकते.

ठळक गोष्टी :
– वाढती जागरूकता, नावीन्यपूर्ण उत्पादनं, कल्पक योजना, सहज उपलब्धता, उत्तम वितरण व्यवस्था.
– भारतातील विमा क्षेत्र हे पुढील दोन वर्षांत 280 अब्ज अमेरिकी डॉलर्स वर पोहोचेल असा अंदाज.
– विम्याचा प्रीमियम भारतीय जीडीपीच्या केवळ 3.70%, त्यामुळं प्रचंड वाव.
– आयुष्यमान भारत’ योजनेमुळं आधार.

या क्षेत्रातील नोंदणीकृत अशा कांही अग्रगण्य कंपन्या म्हणजे, आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल, न्यू इंडिया इश्‍युरन्स, आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल इन्शुरन्स, एचडीएफसी लाईफ, जनरल इन्शुरन्स री इन्शुरन्स (खउठए), एसबीआय लाईफ.

विमा, हेल्थकेअर आणि औषधे; पोर्टफोलियोला द्या बूस्टर डोस (भाग-३)

आता वर उल्लेखल्याप्रमाणे या क्षेत्राच्या हातात हात घालून येणारं क्षेत्र म्हणजे आरोग्यनिगा म्हणजे हेल्थकेअर. या क्षेत्राअंतर्गत रुग्णालयं, वैद्यकीय उपकरणं, क्‍लिनिकल ट्रायल्स, आउटसोर्सिंग, टेलिमेडिसीन आणि वैद्यकीय पर्यटन इ. गोष्टी समाविष्ट आहेत. सर्वात उल्लेखनीय बाब म्हणजे, आशिया आणि पाश्चात्य देशांच्या तुलनेत भारतातील किंमती या स्पर्धात्मक आहेत तर एखाद्या शस्त्रक्रियेची किंमत ही अमेरिका अथवा युरोप मधील किंमतीच्या जवळजवळ 1/10 आहे, त्यामुळं येत्या तीन ते चार वर्षांत हे क्षेत्र वार्षिक 16-17 टक्के वाढ नोंदवत 8.7 ट्रिलियन रुपये म्हणजेच 8.7 लक्ष कोटी रुपये होईल असा कयास आहे. मागील 18 वर्षांमध्ये या क्षेत्रातील थेट विदेशी गुंतवणूक (ऋऊख) ही 6 अब्ज अमेरिकी डॉलर्स झालेली आहे तर मागील वर्षीच प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत दरवर्षी दहा कोटी कुटुंबांना रु. 50 हजार पर्यंत आरोग्यविमा देण्याचं सूतोवाच सरकारनं केलेलं आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)