बसमधील पासधारकांचे पास तपासण्याच्या सूचना

पुणे – गेल्या चार दिवसांपूर्वी शहरात पीएमपीने प्रवास करताना एका अल्पवयीन विद्यार्थ्याकडे बनावट पास आढळला होता. या पार्श्‍वभूमिवर पीएमपीएमएलने बस वाहकांना प्रत्येक पासधारकाचा पास तपासण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

शहरातील सार्वजनिक सेवा म्हणून पीएमपीएमएल बसकडे पाहिले जाते. या बसने प्रवास करण्यासाठी प्रवाशांचीही दिवसेंदिवस संख्या वाढत आहे. बसने प्रवास करताना वाहक पासधारक प्रवाशांच्या पासची तपासणी करत नसल्याचे आढळून आल्याचे दिसून आले आहे. यामुळे बनावट पास, नुतनीकरण न केलेल्या पासधारकांचे फुकट प्रवास करणे फोफावलेले आहे. तसेच, अनेकजण पास नसूनही पास आहे, अशा प्रकारची खोटी बतावणी करत प्रवास करत असल्याचे आढळून आले आहे. याचबरोबर शहरात बनावट पास वापरत अनेक पासधारक प्रवास करत असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे पीएमपीएमएलला आर्थिक तोटाही सहन करावा लागत असल्याने शहरातील बस वाहकांना प्रत्येक पास धारकाचा पास तपासण्याच्या कडक सूचना, पीएमपी प्रशासनाने केलेल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)