मुंबई : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुणे मेट्रोच्या कामकाजाचा आढावा घेतला. हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गासाठी आवश्यक शासकीय जमीन उपलब्ध करुन देण्यासाठी सकारात्मक चर्चा करण्यात आली.
पुणे मेट्रोच्या कामासह पुण्याच्या सर्वांगिण विकासाला गती देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिले.