अमेरिकेतून विदेशी विद्यार्थ्यांना परत जाण्याच्या सूचना

भारतीय विद्यार्थ्यांना मोठा फटका बसणार

वॉशिंग्टन/ न्यूयॉर्क – करोना विषाणूच्या साथीच्या आजारांमुळे जर विद्यापीठांनी ऑनलाईन वर्ग सुरू ठेवले असतील, परदेशी विद्यार्थ्यांना देश सोडावा लागेल किंवा आरोग्याला धोका असल्याने त्यांना हद्दपार करावे लागेल, असे “यूएस इमिग्रेशन अथॉरिटी’ने म्हटले आहे. 2020 च्या शैक्षणिक सत्रासाठी सर्व शाळा ऑनलाईन सुरू आहेत आणि सर्व अमेरिकेतच अभ्यासक्रमांचे वर्ग ऑनलाईन सुरू करण्यात आले असल्याची नोंद घेऊन “द इमिग्रेशन ऍन्ड कस्टम्स एन्फोर्समेंट’ने आज प्रसिद्ध केलेल्या निवेदनात ही सूचना देण्यात आली आहे.

जे अभ्यासक्रम ऑनलाईन सुरू आहेत, त्याच्या शिक्षणासाठी अमेरिकेचा व्हिसा दिला जाणार नाही. तसेच “युएस कस्टम ऍन्ड बॉर्डर प्रोटेक्‍शन’ विभागाकडून या विद्यार्थ्यांना अमेरिकेत प्रवेशाची परवानगीही दिली जाणार नाही, असेही सप्टेंबर- डिसेंबरच्या सत्राचा संदर्भ देऊन या निवेदनात म्हटले आहे.

अमेरिकन विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये शैक्षणिक अभ्याक्रमासाठी आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांनी “एफ -1′ व्हिसाच्या आधारे प्रवेश घेतला आहे. तर भाषा अभ्यासण्याव्यतिरिक्‍त अन्य मान्यता प्राप्त नसलेल्या शिक्षण संस्थांमधील अभ्यासक्रमासाठी विद्यार्थी “एम-1′ व्हिसाचा आधार घेतात.

अमेरिकेत शिक्षण घेणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये सर्वाधिक अडीच लाख विद्यार्थी भारताचे असतात. त्या पाठोपाठ चीनचे विद्यार्थी शिक्षणासाठी अमेरिकेत जात असतात. भारतीय विद्यार्थ्यांची संख्या गेल्या दोन वर्षात 4 लाखांपर्यंत वाढली आहे.

सध्या अमेरिकेत दाखल झालेले विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष उपस्थिती अनिवार्य असलेल्या अन्य शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश बदलून घेण्यासारख्या इतर उपायांबाबत विचार करावा. अशी सूचनाही देण्यात आलेली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.