कराड -नव्याने स्थापन झालेल्या हनुमान विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लि. हनुमानवाडी, ता. कराड या संस्थेचे “संस्था नोंदणी प्रमाणपत्र’ राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांचे हस्ते, जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव यांच्या उपस्थितीत, संस्थेचे नवनिर्वाचित संचालक, संस्थेचे सभासद यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.
संस्था नोंदणीसाठी मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन केल्याबद्दल बाळासाहेब पाटील यांचा संस्थेच्यावतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी चेअरमन उत्तमराव अर्जुगडे, व्हा. चेअरमन जयसिंगराव धर्मे, कैलास अर्जुगडे, यशवंत भोसले, भरत अर्जुगडे, संजय जाधव, बाजीराव माने, तानाजी कदम, सिंधुताई अर्जुगडे, संगीता मोरे, हिंदुराव कमाने, अजित नलवडे, किरण हत्ते, रामचंद्र जाधव, दादासो अर्जुगडे, सयाजी धर्मे, बजरंग हत्ते, माणिक अर्जुगडे, आनंदराव अर्जुगडे, दिलीप धनवे, जयवंत अर्जुगडे, शिवाजी तळेकर, बाळासो नलवडे, मोहन अर्जुगडे, उत्तम कदम, गोविंदा जाधव, निवास हत्ते, शंकर नलवडे, विक्रम अर्जुगडे व सभासद ग्रामस्थ उपस्थित होते.
===============