हरियानात सोनियांच्या ऐवजी राहुल गांधीच जाणार प्रचाराला

सोनियांची सभा काही अपरिहार्य कारणास्तव रद्द

चंदीगड/नवी दिल्ली  – कॉंग्रेच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी या निवडणूक प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात हरियानात महेंद्रगड येथे एक जाहीर सभा आज घेणार होत्या.

पण त्यांची ही सभा आज काही अपरिहार्य कारणास्तव रद्द करण्यात आल्याचे जाहींर करण्यात आले असून त्यांच्या ऐवजी राहुल गांधी यांनाच तेथे सभेसाठी पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र आणि हरियानाच्या निवडणूक प्रचारात सोनिया गांधी या सहभागी झाल्या नव्हत्या मुळे चर्चा सुरू झाली असतानाच त्यांची हरियानातील सभा जाहीर झाली होती पण तीही रद्द करण्यात आली आहे.

सोनिया गांधी यांनी एक व्हिडीओ संदेश जारी करून मतदारांना कॉंग्रेसला विजयी करण्याचे आवाहन केले आहे. राहुल गांधी यांची हरियानातील ही दुसरी सभा असेल या आधी त्यांनी 14 ऑक्‍टोबर रोजी मेवात भागातील नूह येथे पहिली जाहींर सभा घेतली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.