Mallikarjun Kharge | काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. ‘मुलगी वाचवा, मुलगी शिकवा’ या योजनेला १० वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून उत्सव साजरा केला जात असताना बुधवारी मल्लिकार्जुन खर्गे यांनी ट्वीटद्वारे सरकारला तीन प्रश्न विचारले आहेत.
मल्लिकार्जुन खर्गे यांनी बुधवारी या योजनेच्या बजेटपैकी 80 टक्के जाहिरातींवर खर्च झाल्याचा दावा केला. त्यांनी X वर पोस्ट करत ‘मुलगी वाचवा’ ऐवजी भाजपने ‘गुन्हेगार वाचवा’ ही योजना का सुरू केली? मणिपूरच्या महिलांना कधी न्याय मिळणार? हाथरसची मागासवर्गीय मुलगी असो, उन्नावमधील लेक किंवा आमच्या महिला कुस्तीपटू असो या प्रकरणात भाजपने नेहमी गुन्हेगारांचे संरक्षण का केले? देशात दर तासाला ४३ महिलांविरुद्धचे गुन्हे का नोंदवले जातात? Mallikarjun Kharge |
80 टक्के निधी केवळ मीडिया जाहिरातींवर खर्च
आपल्या देशात सर्वात असुरक्षित दलित-आदिवासी समाजातील महिला आणि मुलांवर दररोज २२ गुन्हे नोंदवले जातात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात महिलांच्या सुरक्षेवर अनेकदा भाष्य केले, पण बोलण्यात आणि वागण्यात फरक का? तिसरे कारण म्हणजे 2019 पर्यंत ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ योजनेसाठी देण्यात आलेल्या एकूण निधीपैकी सुमारे 80 टक्के निधी केवळ मीडिया जाहिरातींवर खर्च झाला आहे. संसदीय स्थायी समितीने जेव्हा ही वस्तुस्थिती उघड केली तेव्हा 2018-19 ते 2022-23 या कालावधीत या योजनेत वापरल्या जाणाऱ्या निधीत 63 टक्क्यांनी मोठी कपात करण्यात आल्याचा दावा खर्गे यांनी केला. Mallikarjun Kharge |
बेटी बचाओ के दस साल, मोदी जी से हमारे तीन सवाल —
♀️बेटी बचाओ” की जगह “अपराधी बचाओ” की नीति भाजपा ने क्यों अपनाई? मणिपुर की महिलाओं को न्याय कब मिलेगा? हाथरस की दलित बेटी हो या उन्नाव की बेटी, या फ़िर हमारी चैंपियन महिला पहलवान, भाजपा ने हमेशा अपराधियों को संरक्षण क्यों दिया?… pic.twitter.com/XKGCP1vWe0
— Mallikarjun Kharge (@kharge) January 22, 2025
मिशन शक्ती अंतर्गत संबल नावाच्या योजनेत त्याचा समावेश करून सरकारने बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेवरील खर्चाचे आकडे देणे बंद केले. ते म्हणतात की संबलसाठी 2023-24 साठी वाटप केलेला आणि वापरला जाणारा निधीही 30 टक्क्यांनी कमी करण्यात आला आहे. काही लपवण्यासाठी आकडेवारीत फेरफार करण्यात आला का, असा सवाल खर्गे यांनी केला.
काँग्रेस अध्यक्ष पुढे खर्गे म्हणाले, गेल्या 11 वर्षात मोदी सरकारने महिला आणि बालविकास मंत्रालयावर खर्च होणारा अर्थसंकल्प संपूर्ण अर्थसंकल्पाच्या खर्चाच्या तुलनेत निम्म्यावर का आणला? प्रत्येक ट्रकच्या पाठीमागे किंवा प्रत्येक भिंतीवर रंगवलेले बेटी बचाओ योजनेने महिलांवरील अत्याचारानंतर त्यांना न्याय मिळणार का, त्यांना रोजगाराच्या संधी, चांगल्या आरोग्य सुविधा मिळतील का? महिलांवर हल्ला करणाऱ्या भाजपच्या पोकळ जाहिराती 10 वर्षांनंतरही त्यांचा दुटप्पीपणा दाखवतात, असा आरोप त्यांनी केला.