इंस्टाग्रामने केला भगवान शंकरांचा अपमान; हातात दाखवला वाईनचा ग्लास अन्…

नवी दिल्ली –  येथे सोशल मीडिया अँप इंस्टाग्राम विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. भाजप नेत्याने आरोप लगावला आहे की इंस्टाग्रामने त्यांच्या स्टिकरमध्ये भगवान शंकराचा अपमान केला आहे. भाजप नेत्याच्या या आरोपावर दिल्ली पोलिसांनी तपास सुरु केला आहे.


सध्या भारतात सोशल मीडिया प्लेटफॉर्म्सवरील नियमांवरून वादविवाद सुरु आहे. यातच भाजप नेते मनीष सिंह यांनी सोशल मीडिया  अँप विरोधात दिल्लीतील संसद मार्ग पुलिस चौकीत एफआईआर  (FIR) दाखल केली आहे.

मनीष सिंह यांनी याबाबत सांगितले की,’इंस्टाग्रामवर महादेवाच्या प्रतिमेचे अवमान केले जात असून त्यांच्या फोटोला चुकीचा पद्धतीने दाखविण्यात आले आहे.  इंस्टाग्रामवर शिव हा शब्द सर्च केल्यास स्टिकरमध्ये महादेवाच्या फोटोसह वाईन आणि दारूचे फोटो दिसून येत आहे.’

ते पुढे म्हणाले,’भगवान शिवाच्या एका हातात वाईनचा ग्लास तर दुसऱ्या हातात मोबाईल दाखविण्यात येत आहे. यामुळे हिंदू धर्मांच्या भावना दुखावल्या आहे.’ असं म्हणत त्यांनी या प्रकरणात त्वरीत चौकशीची मागणी केली आहे.  दरम्यान अनेकांनी सोशल मीडियावर या स्टिकरवर  नाराजी व्यक्त केली आहे.  तर भाजप नेत्या प्राची साध्वी यांनी या स्टिकरवर नाराजी व्यक्त करत मनीष सिंह यांचे ट्विटला सोशलवर पाठिंबा दिला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.