तारा सुतारियाच्या कामातून प्रेरणा मिळते – अनन्या पांडे

चंकी पांडेची मुलगी आणि अभिनेत्री अनन्या पांडेने यंदाच्या वर्षी करण जोहरच्या “स्टुडेंट ऑफ द इयर-2′ या चित्रपटातून बॉलिवुडमध्ये डेब्यू केले. तर सारा अली खान आणि जान्हवी कपूर यांनी गतवर्षी म्हणजे 2018मध्ये डेब्यू केले होते. त्यानंतर या तिन्ही अभिनेत्रींची एकमेकींशी सतत तुलना करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, अनन्याला सारा आणि जान्हवीसोबत काही जास्तच कंपेयर केले जात आहे.

दरम्यान, एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत अनन्याने सारा आणि जान्हवीसोबत होणा-या तुलनेबाबत दिलखुलासपणे सांगितले. अनन्या म्हणाली, फक्‍त सारा आणि जान्हवीच नव्हे तर तारा सुतारियाही खूपच चांगले काम करते. तिच्या कामामुळे मला खूपच प्रेरण मिळत असते, असे तिने सांगितले.

अनन्या म्हणाली, मला हेल्दी कॉम्पिटिशन आवडतात आणि मी त्यावर विश्‍वास ठेवते. कारण यामुळे मला अधिकाधिक परफॉर्म करण्यासाठी प्रेरणा मिळते. सर्वांना चांगली संधी मिळत असून सर्वांचा परफॉर्म चांगला आहे.

वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास, अनन्याचा दुसरा चित्रपट म्हणजे “पति, पत्नी और वो’ नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला बॉक्‍स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळत आहे. यात तिच्यासोबत कार्तिक आर्यन आणि भूमि पेडणेकर यांनी मुख्य भूमिका साकारली आहे. याशिवाय ती “खाली पीली’ चित्रपटात झळकणार असून यात तिच्या ऑपोजिट ईशान खट्‌टर असणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.