“कलासागर’ परिवाराचे शिक्षण क्षेत्रातील कार्य प्रेरणादायी

साहित्य परिषद कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांचे प्रतिपादन
दहावी-बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार 

वाई – कलासागर ऍकॅडमी परिवाराकडून ग्रामीण भागातील विद्यार्थी केंद्रबिंदू मानून ज्ञानार्जनाचे कार्य अखंडपणे चालू आहे. यात होतकरू गरीब विद्यार्थ्यांना विषेश सहकार्य केले जाते. कलासागर ऍकॅडमी परिवाराचे शिक्षण क्षेत्रातील कार्य इतरांसाठी प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलींद जोशी यांनी केले. कलासागर ऍकॅडमीच्यावतीने आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभात ते बोलत होते.

यावेळी ज्येष्ठ साहित्यिक रवींद्र बेडकीहाळ, विनोद कुलकर्णी, नगराध्यक्षा डॉ. प्रतिभा शिंदे, कलासागर परिवाराचे प्रमुख प्रा. लहूराज पांढरे, प्रा. हेमंत काळोखे, प्रा. स्वाती पांढरे, प्रकाश वाडकर, प्रा. डॉ. नवनाथ चव्हाण, प्रा. डॉ. चंद्रकांत, मुख्याध्यापक संजय काबळे, अरूण अदलिंगे यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, विद्यार्थ्यांनी इंटरनेटच्या जगात वावरताना ध्येय ठरवून त्या दिशेने वाटचाल करणे आज काळाची गरज आहे. पालकांनीसुध्दा मुलांमधील सुप्त गुण ओळखून त्या गुणांना वाव देणे आवश्‍यक आहे. विद्येला साधना मानून शिक्षण घेणाऱ्यास सर्वोच्चपदावर जाण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. मनगटात बळ निर्माण करणारे शिक्षण मिळावे तर एक सुसंस्कृत व अष्टपैलू पिढी निर्माण होण्यास मदत होईल. हे कार्य मात्र वाई-शहरासह फलटण, पुणे येथे अविरतपणे कलासागर परिवाराकडून चालू आहे.

प्रमुख पाहुंण्यानी मनोगत व्यक्‍त करून कलासागर ऍकॅडमी शिक्षणक्षेत्रात राबवित असलेले नवनवीन प्रयोगांचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. कलासागर ऍकॅडमी परिवाराच्यावतीने उपस्थितांचे शाल व पुष्पगूच्छ श्रीफळ देऊन स्वागत केले तर उपस्थित प्रमुख पाहूण्यांच्या हस्ते 10 वी 12 वी व स्पर्धा परीक्षांमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र व पुस्तक देवून सन्मान करण्यात आला.

यावेळी यशस्वी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्‍त केले. प्रास्तविक प्रा. हेमंत काळोखे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अलका बागुल तर प्रा. लहुराज पांढरे यांनी आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. सुभाष चौगुले, प्रा. विशाल खाडे, क्षितिज कुलकर्णी, प्रा. विजय शिंदे, सचिन प्रतापुरे, प्रा. विष्णू उजगरे, गुलाबराव धनावडे, अस्मिता जैन, प्रतिक्षा भाडळकर, स्वाती क्षीरसागर, सविता गायकवाड, श्‍वेता पिसाळ, गौरी शेडगे, सेवक सुरेश चौधरी यांनी परिश्रम
घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.