कोल्हापूर : आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी आज शाहू क्लॉथ मार्केट येथील के.एम.टी ऑफिस, रेकॉर्ड विभाग, घरफाळा विभाग व सीएफसी सेंटरची दुपारी पहाणी केली.
यावेळी त्यांनी रेकॉर्ड व सीएफसी सेंटरकडील कर्मचा-यांना या ठिकाणी दाखल्यासाठी व रेकॉर्डसाठी येणा-या कर्मचा-यांशी सौजन्याने वागणे, त्यांचे नमस्कार करुन स्वागत करणे, त्यांना आवश्यकते दाखले अथवा रेकॉर्ड कसे जागेवर तात्काळ देता येतील याबाबत काळजी घेणेच्या सूचना दिल्या.
तसेच के.एम.टी. कडील ड्रायव्हर व कंन्डेक्टर यांनी के.एम.टी. बस मध्ये येणा-यां प्रवाशांचे नमस्कार करुन स्वागत करणे त्यांना चांगली सेवा उपलब्ध करुन दयावी के.एम.टी चे उत्पन्न वाढिसाठीही सर्वानी प्रयत्न करावे अशा सूचना दिल्या.
तसेच सकाळी आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी खाते प्रमुखांच्या आढावा बैठकीमध्ये सर्व खातेप्रमुखांनी त्यांचे अधिनस्त कर्मचारी वेळेवर हजर रहातात का नाहीत ते पाहावे.
दर महिन्याची हजेरी आस्थापण विभागाकडे पाठविण्यापुर्वी आपले अधिनस्त सर्व कर्मचारी सकाळी 10.10 पर्यंत हजर आहेत का हे तपासावे या वेळेनंतर आलेलेे कर्मचारी दिसून आल्यास त्यांचेवर कारवाई करावी अशा सूचना दिल्या. हे कर्मचारी वांरवार ऑफिसच्या बाहेर जाता कामा नयेत जायचे झालेस नोंदवहीमध्ये कोणत्या कामासाठी जाणार याची नोंद ठेवावी असे सांगितले.
यावेळी शहर अभियंता नेत्रदिपक सरनोबत, उपशहर अभियंता बाबुराव दबडे व रेकॉर्ड, के.एम.टी. विभागाकडील कर्मचारी उपस्थित होते.