Video : INS KOLKATA युद्धनौकेने कतार, कुवेतहून वाहून आणला ५४ मेट्रिकटन ऑक्सिजन

मंगळुरु ( INS KOLKATA ) – देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. नव्या बाधितांच्या संख्येत दररोज धक्कादायक वाढ होत असून यामुळे आरोग्यव्यवस्थेवर कमालीचा ताण आला आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये रुग्णांचे नातेवाईक हॉस्पिटल बेड्स, रेमडीसीवीर, ऑक्सिजन सिलिंडर्ससाठी वणवण भटकताना दिसतायेत. अशातच, देशासमोर उभे ठाकलेल्या प्रत्येक संकटावेळी मैदानात उतरून त्यावर मात करण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या भारतीय सैन्याने करोना संकटातही मोर्चा सांभाळला आहे.

सध्या देशभरात ऑक्सिजन, रेमडीसीवीर यांचा तुटवडा असतानाच भारतीय सैन्यदले देशाच्या कानाकोपऱ्यात ही सामग्री पुरवताना दिसत आहे. अशातच आज भारतीय नौदलाच्या आयएनएस कोलकाता ( INS KOLKATA ) या युद्धनौकेने  कतार व कुवेत यांनी पाठवलेला ५४ मेट्रिक टन ऑक्सिजन मंगळुरु येथे वाहून आणला. यासोबतच ४०० ऑक्सिजन सिलिंडर्स व ४७ ऑक्सिजन जमा करणारी उपकरणेही आयएनएस कोलकातातून मंगळुरु येथे पोचली आहेत.

दरम्यान, करोनाच्या पहिल्या लाटेमध्ये भारतामध्ये विषाणू संसर्गाचे प्रमाण कमी होते. तेव्हा भारताने विषाणू संसर्गाचा गंभीर फटका बसलेल्या देशांना मोठी मदत केली होती. मात्र भारताला सध्या विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेने जेरीस आणले असून यामुळे ऑक्सिजन, रेमडीसीवीर व इतर वैद्यकीय सामग्रीचा तुटवडा भासत आहे. पहिल्या लाटेत भारताने केलेल्या मदतीची जाणीव ठेऊन अनेक देश भारताला करोनाविरोधातील लढ्यात मदत करताहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.