आयएनएस खंदेरीचा भारतीय नौदलाच्या ताफ्यात समावेश

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केले पाणबुडीचे अनावरण

नवी दिल्ली : भारतीय नौदलाकडे दुसऱ्या स्कॉर्पिन प्रकारातील पाणबुडी असलेल्या आयएनएस खंदेरीचा भारतीय नौदलात नुकताच समावेश करण्यात आला आहे. याअगोदर या प्रकारातील आयएनएस कलावरी चार वर्षापुर्वी नौदलात दाखल झाली होती. तर आता आयएनएसच्या खंदेरीचा मुंबईच्या नौदलात समावेश झाला आहे. आयएनएस खंदेरी दुसऱ्या श्रेणीतील कलावरी सबमरीन म्हणजेच पाणबुडी आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते आयएनएस खंदेरी या दुसऱ्या स्कॉर्पिन पाणबुडीचे अनावरण करण्यात आले.

संपूर्ण भारतीय बनावटीच्या, अद्ययावत अशी आयएनएस खंदेरी ही पाणबुडी आज नौदलाच्या ताफ्यात दाखल करण्यात आली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते या पाणबुडीचे अनावरण करण्यात आले. पाणबुडीच्या सर्व चाचण्या यशस्वीपणे पार पडल्या आहेत. कलवरी श्रेणीतील ही दुसरी पाणबुडी असून डिझेल-विद्युत प्रकारातील सर्वात प्रगत तंत्रज्ञानाचा वापर यामध्ये करण्यात आला आहे. मुंबईवर 26/11 रोजी दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. तसाच कट आता पुन्हा रचला जात आहे. तो आता यशस्वी होऊ देणार नाही. कोणीही देशातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला तर नौदलाकडून त्याला सडेतोड उत्तर दिले जाईल, असे राजनाथ सिंग यावेळी म्हणाले. 1971 च्या युद्धात नौदलाची भूमिका ही महत्त्वपूर्ण होती. भारतीय नौदलाने व्यापारी मार्गावर नियंत्रण मिळवले होते. त्यामुळे पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होत त्यांचे कंबरडे मोडले होते. आयएनएस खंदेरीमुळे भारतीय नौदलाची क्षमता अनेक पटींनी वाढली आहे, हे पाकिस्तानने आता लक्षात ठेवावं. देशातील सशस्त्र दलांच्या क्षमता वाढवण्यासाठी आणि त्यांच्या आधुनिकीकरणासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असेही त्यांनी नमूद केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावरूनच या पाणबुडीचे नाव ठेवण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी नौदलाचे सामर्थ्य ओळखले होते. त्यांचे जे स्वप्न होते ते पूर्ण करण्याची क्षमता भारतीय नौदलात आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, कलवरी श्रेणीतील सहा पाणबुडया बांधण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. त्याअंतर्गत ही दुसरी पाणबुडी नौदलात दाखल होत आहे. या पाणबुडीची बांधणी माझगाव डॉकने केली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)