सुशांत प्रकरणी मित्र आणि नोकरांची चौकशी

मुंबई – अभिनेता सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणात सीबीआयने आज मंगळवारी सकाळी सुशांतचा रूम पार्टनर सिद्धार्थ पिथानी, त्यांचे नोकर नीरजसिंह आणि दिपेश सावंत यांना चौकशीसाठी पाचारण केले.

कलिना येथील डीआरडीओच्या गेस्ट हाऊसवर त्यांची चौकशी करण्यात आली. 14 जून रोजी जेव्हा सुशांतने आत्महत्या केली त्यादिवशी हे तिघेही तिथे उपस्थित होते. त्यांना सीबीआयने या आधीही चौकशीसाठी बोलावले होते. त्यांना आज पुन्हा चौकशीसाठी दुसऱ्यांदा पाचारण करण्यात आले.

मुंबई पोलिसांच्या एका पथकानेही या गेस्ट हाऊसमध्ये सीबीआयच्या तपास पथकाची भेट घेतली. सीबीआयने मुंबई पोलिसांनी केलेल्या या प्रकरणातील तपासाचाही तपशील मागवला आहे, असे सांगण्यात येते.

सुशांतच्या आर्थिक स्थितीच्या संबंधात माहिती घेण्यासाठी सीबीआयने त्याचा सीए आणि अकौंटटलाही चौकशीसाठी बोलावले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.