चेन्नई : दक्षिण चित्रपटातील सुपरस्टार विजय यांची आज इनकम टॅक्सच्या अधिकाऱ्यानी चौकशी केली. त्याच्यावर कर चोरीचा आरोप आहे. याचबरोबर एजीएस सिनेमा, आणि चित्रपट निर्माता अंबू चेलियन यांच्या मालमत्तांचीही चौकशी करीत आहेत. एजीएस सिनेमाच्या बॅनरखाली विजय ‘बिगिल’ चित्रपट केला होता.
विजय यांच्या नवीन चित्रपटाची निर्मिती एजीएसने केली आहे. या चित्रपटाने देशभरात 300 कोटींहून अधिक कमाई केली आहे. आयकर विभागाने सकाळपासूनच एजीएस एंटरप्रायजेसच्या मालमत्तांवर छापे टाकत आहेत.