जिल्हा रुग्णालयातील पंचवाघची “एसीबी’कडून चौकशी

सातारा (प्रतिनिधी) – जिल्हा रुग्णालयातील लाच मागणी प्रकरणात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांच्यांनतर एडस्‌ विभागातील कंत्राटी कामगार विनय पंचवाघ याची सोमवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी करण्यात आली.

याबाबत माहिती अशी, वाई येथील एका हॉस्पिटलच्या नूतनीकरणासाठी आणि बॉम्बे नर्सिंग ऍक्‍टनुसार नोंदणी करण्यासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयातील लिपिक अमित राजे याने काही दिवसांपूर्वी 40 हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून त्याला अटक केली होती.

गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याच दिवशी राजे फरार झाल्यानंतर डॉ. गडीकर यांची चौकशी झाली होती. त्यानंतर राजेला अटक करून चौकशी केल्यानंतर विनय पंचवाघ याचे नाव पुढे आले होते.

मात्र, पंचवाघ चौकशीसाठी एसीबी कार्यालयात हजर राहत नव्हता. अखेर त्याला सोमवारी चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर पोलीस निरीक्षक आरिफा मुल्ला यांनी त्याची सुमारे दोन तास चौकशी केल्याचे सूत्रांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.