फुटीरवादी नेते मिरवैज उमर फारूख यांची एनआयएकडून चौकशी

नवी दिल्ली – काश्‍मीरातील फुटीरवादी नेते मिरवैझ उमर फारूख यांना आज एनआयएने चौकशीसाठी दिल्लीच्या कार्यालयात पाचारण केले होते. दहशतवाद्यांना दिल्या जाणाऱ्या निधीच्या संबंधात त्यांना चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले. दिल्लीत एनआयएच्या मुख्यालयात चौकशीसाठी हजर राहण्यासाठी त्यांनी सुरक्षेची मागणी केली होती.

आपली सुरक्षा व्यवस्था काढून घेतल्याने आपण दिल्लीला हजर राहू शकत नाही पण दिल्लीत जर सुरक्षा पुरवली जाणार असेल तर आपण तेथे उपस्थित राहु असे फारूख यांनी कळवले होते त्यानुसार त्यांना दिल्लीत सुरक्षा पुरवण्यात आली आहे. त्यांच्या समवेत हुर्रियत कॉन्फरन्सचे नेते अब्दुल गनी लोने, मौलाना अब्बास अन्सारी हेही उपस्थित होते. याच नेत्यांनी सन 2004 मध्ये तत्कालिन पंतप्रधान वाजपेयी आणि तत्कालिन गृहमंत्री लालकृष्ण आडवाणी यांची काश्‍मीर प्रश्‍नावर तोडगा काढण्यासाठी भेट घेतली होती.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.