बहिणीची सरपंचपदी निवड होताच भावाकडून इनोव्हा कार गिफ्ट

वाघोलीचे माजी उपसरपंच रामकृष्ण सातव पाटील यांची बहिणीला अनोखी भेट

वाघोली( प्रतिनिधी) : हवेली तालुक्यातील अष्टापूर गावच्या सरपंचपदी कविता योगेश जगताप यांची निवड होताच त्यांचे बंधू वाघोलीचे मा. उपसरपंच व पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य रामकृष्ण सातव पाटील यांनी नवी कोरी इनोव्हा कार बहिणीला गिफ्ट दिली. सरपंचपदी विराजमान झाल्यानंतर भावाकडून अनोखी भेट मिळाल्यानंतर जगताप यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

अष्टापूरचे जगताप कुटुंबीय व वाघोलीचे सातव कुटुंबिय हवेली तालुक्याच्या राजकारणात नावलौकिक असणारी कुटुंबे आहेत. अष्टापूर गावाच्या सरपंचपदाच्या निमित्ताने कविता जगताप राजकारणात पदार्पण करीत असल्याने बहिणीचा जनसंपर्क वाढावा, गावाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी हातभार लागावा व बहिण-भावाचे नाते अधिकाधिक घट्ट व्हावे यासाठी बहिणीला प्रेमाची भेट दिली असल्याचे रामकृष्ण सातव पाटील यांनी सांगितले. बहिण भावाचे नाते अतूट निर्माण करण्यासाठी नवीन पिढीतील तरुणांनी याचा आदर्श घ्यावा असा आशावाद उपस्थितांनी व्यक्त केला.

अनोख्या गिफ्ट ची बरसात ..

रामकृष्ण सातव पाटील यांची नुकतीच पुणे जिल्हा नियोजन समितीवर वर्णी लागली आहे. रामकृष्ण सातव पाटील यांचे निकवर्तीय सचिन जाधव यांच्या पत्नी रोहिणी जाधव ह्या केसनंद ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी विराजमान झाल्या आहेत. तर  रामकृष्ण सातव पाटील यांची  बहीण  कविता जगताप यांची अष्टापुर ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी विराजमान झाल्याने रामकृष्ण सातव पाटील यांचे राजकीय वजन सद्या या अनोख्या गिफ्ट ने देखील वाढू लागले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.